गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचा फटका आता जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार सोहळ्याला देखील बसला आहे. हा सोहळा आता पुढे ढकलण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ...
शासनाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकालाच ठाणे महापालिकेकडून हरताळ फासला जात असल्याची बाब समोर आली आहे. सण सोहळ्यांवर पालिकेकडून दरवर्षी कोट्यावधींची उधळण केली जात आहे. ...
ठाणे परिवहन सेवेच्या भंगार बसेस आता महापालिका आयुक्तांनी उपयोगात आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार या भंगार बसेसमध्ये महिलांसाठी टॉयलेट सेवा सुरु करण्याचा निर्णय अधिकारी परिषदेत घेण्यात आला. ...
ठाण्यातील गडकरी रंगायतनाच्या दुरुस्तीचे काम शनिवार पासून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु या दुरुस्तीला काही दिवस जाणार असल्याने २५ डिसेंबर पर्यंतचे सर्व प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. ...
ठाणे महापालिकेने आता आपत्तीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या धर्तीवर टीडीआरएफच्या टिमची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एका त्री सदस्यीय समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे. ...
ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्याचा तांत्रिक अहवाल येण्यास आणखी तीन दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस सर्व प्रयोग रद्द करण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. ...
ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनाच्या खालील बाजूस असलेल्या प्रेक्षागॅलरीच्या छताच्या पिओपीचा काही भाग पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुदैवाने मोठी हानी झाली नसली तरी देखील हे नाटयगृह आता तांत्रिक अहवाल येईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. ...
ठाणे महापालिकेचे फेरीवाला धोरण आता खऱ्या अर्थाने मार्गी लागणार आहे. तीन वर्षापूर्वी गठीत केलेली समिती याचे काम पाहणार असून, शहरात आजच्या घडीला सात हजार फेरीवाले आहेत. ...