ब्राह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तरीत्या विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोस हे रडारला चकवा देणारं सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे. ते पाणबुडीतून, जहाजातून, विमानातून किंवा जमिनीवरूनही डागता येऊ शकतं. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया या देशांची नौदलं एजिस कॉम्बॅट सिस्टम ही अद्ययावत यंत्रणा वापरतात. त्यात कॉम्प्युटर आणि रडार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शत्रूच्या शस्त्राचा बिमोड करता येतो. या यंत्रणेला टक्कर देण्याची ताकद ब्राह्मोसमध्ये आहे. Read More
विमान प्राधिकरणाकडून परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे हेरगिरीच्या आरोपात पकडण्यात आलेल्या निशांत अग्रवालला लखनौला नेण्यासाठी तब्बल एक दिवस उशीर झाला. अखेर बुधवारी परवानगी मिळाली. ...
ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती, देखभाल आणि त्या संबंधाची माहिती तसेच भारतीय सुरक्षेसंदर्भातील संवेदनशील माहिती पाकिस्तान आणि कॅनडात बसलेल्या ‘बॉस’कडे पोहचत होती, अशी प्रचंड खळबळजनक माहिती सूत्रांच्या माध्यमातून पुढे आली आहे. ...
ब्राह्मोस ह्या क्षेपणास्त्राची अत्यंत गोपनीय माहिती निशांत अग्रवाल या शास्त्रज्ञाने पाकिस्तान आणि अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाला पुरवल्याचे प्रकरण उघडकीस आल्यापासून भारतीय संरक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...