ब्राह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तरीत्या विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोस हे रडारला चकवा देणारं सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे. ते पाणबुडीतून, जहाजातून, विमानातून किंवा जमिनीवरूनही डागता येऊ शकतं. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया या देशांची नौदलं एजिस कॉम्बॅट सिस्टम ही अद्ययावत यंत्रणा वापरतात. त्यात कॉम्प्युटर आणि रडार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शत्रूच्या शस्त्राचा बिमोड करता येतो. या यंत्रणेला टक्कर देण्याची ताकद ब्राह्मोसमध्ये आहे. Read More
Brahmos Deal with Vietnam : चीनच्या या दादागिरीमुळे फिलीपिन्स, व्हिएतनाम, तैवान आणि मलेशियासारख्या देशांच्या सागरी भागावर कब्जा होण्याचा धोका वाढला आहे. अशा स्थितीत, भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र या देशांसाठी एक मजबूत सुरक्षा कवच सिद्ध होऊ शकते... ...
आमच्या हद्दीत घुसलेल्या भारतीय क्षेपणास्त्रावर आम्ही नजर ठेऊन होतो, असं पाकिस्ताननं सांगितलं.. नजर ठेवली होती, मग क्षेपणास्त्र कोसळण्याआधीच नष्ट का केलं नाही, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. ...
या क्षेपणास्त्रातील सब सिस्टिम्स या देशातच विकसित केल्या गेल्या आहेत. त्याच्या उड्डाणाची चाचणी सकाळी १०.३० वाजता बालासोरमधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवर जमिनीवरील मोबाईल लाँचरवरून केली गेली ...