कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
भारत जोडो पदयात्रेत सतेज पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातून भगवे फेटे घालून हजारो जण पदयात्रेत सहभागी झाले आहेत. कोल्हापूरची ओळख असलेल्या कुस्तीतील मल्लसुद्धा या यात्रेत सहभागी झाले आहेत. ...
देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. याविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून भारत जोडो यात्रेत आम्ही एकत्र आलो आहोत, अशी भूमिका युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली. ...
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या तेलंगाणा राज्याच्या सीमेपासून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. त्या दृष्टीने जयत तयारी केली जात आहे. ...