बाबा आमटे (मुरलीधर देविदास आमटे) यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी झाला. कुष्ठरोग्यांचं पुनर्वसन आणि सशक्तीकरण यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केलं. यासाठी त्यांना पद्म विभूषण, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मॅगसेसे पुरस्कार यासारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. समाजातील दीन दुबळ्यांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या बाबा आमटे यांनी 9 फेब्रुवारी 2008 रोजी अखेरचा श्वास घेतला. Read More