अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे. Read More
Ashvini Mahangade : अश्विनीचा भाऊ बद्री ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला होता तेव्हाचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी तिने राजकारणाबद्दलचंही मत व्यक्त केले आहे. ...
Ashvini Mahangade : अश्विनी महांगडे हिचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न साकार झाले असून नुकतेच तिला म्हाडाच्या घराची चावी मिळाली आहे. आता तिने सोशल मीडियावर घराची झलक दाखवली आहे. ...