अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे. Read More
अश्विनीने शेतात काम करतानाचा तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, शेतकऱ्याची लेक... जगणं सोडता येत नाही आणि लढणं थांबवता येत नाही. ...