करमाळा बाजार समितीमध्ये दररोज किमान ५ हजार क्विंटल उडदाची आवक होत असून चालू हंगामात सुमारे ७५ कोटींची बाजार समितीमध्ये उडीद खरेदीमध्ये आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ...
अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील शांतलिंगेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज ४ ते ५ हजार पोती उदडाची आवक झाली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ६८ हजार पोती उडदाची आवक झाली आहे. ...
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये शनिवारी (दि. १४) उच्च प्रतीच्या गावरान कांद्याला तब्बल ५५ रुपये किलोचा भाव मिळाला आहे. ...
सोलापूर बाजार समितीत कांद्याला सध्या चांगला दर मिळत आहे. कर्नाटकातील नवीन पांढऱ्या कांद्याची आवक सुरू झाली आहे. शिवाय पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील जुना लाल कांदा आता विक्रीला येत आहे. ...
नगर तालुक्यातील युवा प्रयोगशील शेतकऱ्याच्या डाळिंबाला पुणे बाजार समितीच्या लिलावात प्रतिकिलो ५०१ रुपयांचा भाव मिळाला आहे. यंदाच्या डाळिंबाच्या हंगामातील हा सर्वोच्च भाव ठरला आहे. ...
माढा तालुक्यात नुकत्याच पडलेल्या पावसामुळे अगदी काढणीस आलेली खरीप पिके धोक्यात आली. त्यातल्या त्यात उडीद पिकाला त्याचा मोठा फटका बसला. पावसाची थोडी उघडीप मिळताच शेतकऱ्यांकडून उडीद काढणीला प्रारंभ झाला आहे. ...