ब्रेन डेड अवस्थेतील मुकेश अमृतलाल पिंजानी यांचे हृदय, यकृत व मूत्रपिंड सोमवारी दुपारी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबई व नागपूरला पाठविण्यात आले, तर नेत्रदानानंतर नेत्रपटल जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रविभागात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. ...
- गजानन मोहोडअमरावती : संसदेत २००८ मध्ये कीटकनाशक व्यवस्थापन कायद्याला विरोध झाल्यामुळेच कंपण्याचे फावल्याने राज्यासह देशात कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे शेतक-यासह शेतमजुरांचे हजारो बळी जात आहे. त्यामुळे हा कायदा अस्तिस्वात आणून प्रभावीपणे अंमलबजावणी व ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात लाच घेताना पकडलेले २१५ लाचखोर अद्यापही निलंबनापासून दूर आहेत. संबंधित विभागांनी त्या लाचखोरांच्या निलंबनाचे आदेश न काढल्याने ते उजळमाथ्याने सरकारी नोकरी करीत आहेत. ...
प्रतीक्षा माझ्यासोबत राहण्यास सतत नकार देत असल्याने मी हेलावलो, विमनस्क झालो, तडपलो, त्याच प्रेमासाठी तीही तडपावी, यासाठी तिला केवळ ‘जखम ’द्यायची होती, तिला मारण्याचा माझा उद्देश मुळीच नव्हता, अशी कबुली आरोपी राहुल भड याने राजापेठ पोलिसांना दिली. ...
अमरावतीच्या वृंदावन कॉलनीतील ओंकार मंदिराजवळ प्रतीक्षा मेहेत्रे नावाच्या तरुणीची भोसकून हत्या झाली. या प्रकरणी राहुल भड नावाच्या तरुणाला अटकही झाली. या घटनेनंतर गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी प्रतीक्षा मेहेत्रेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ...
प्रेमप्रकरणानंतर निर्माण झालेल्या वादातून एका तरुणीची चाकुने भोसकून हत्या करण्यात आली. साईनगरस्थित बिहाडी चौकात गुरुवारी दुपारी १२.१० वाजता घडलेल्या या थरारक घटनेमुळे अमरावतीत खळबळ उडाली. ...
वाहनाचा मनपसंत क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी परिवहन विभागाकडे तब्बल ७७ कोटी रुपये मोजलेत. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांतील ही आकडेवारी आहे. राज्यातील ९९ हजारांवर वाहनधारकांनी पाच हजार ते तब्बल अडीच लाख रुपये भरून हे ‘चॉइस नंबर’ मिळविले आहेत ...