पंचायत राज व्यवस्थेत ७३ व्या घटना दुरुस्तीने आमूलाग्र सुधारणा झाल्या. त्याचप्रमाणे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला ७४ व्या घटना दुरुस्तीने मोठे बळ दिले. त्याला २५ वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकशाही निवडणूक व प्रशासन यासंदर्भात विभागीय स्तरावर ...
विद्यापीठ स्तरावर होणारा दीक्षांत समारंभ आता महाविद्यालय स्तरावर घेण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक सत्रापासून होईल, अशी माहिती आहे. ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयातून तब्बल तीन वर्षांनंतर स्मार्ट आरसीचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. या आठवड्यात स्मार्ट आरसीचा मुहूर्त साधण्यात येणार असून, त्यासाठी अर्जदाराकडून २०० रुपये शुल्क आकारला जाणार आहे. ...
जलयुक्तसह जल व मृद् संधारणाच्या कामांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी जलसमृद्धी योजनेच्या माध्यमातून १७.६० लाखांपर्यंतचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे व त्यावरील व्याजाचे दायित्व शासन अदा करणार आहे. ...
हिरापूरनजीकच्या गौरखेडा शिवारात अस्वलीने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला. या परिसरात घडलेली ही तिसरी घटना होय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत असून वनविभागाविषयी नाराजी व्याप्त आहे. ...
एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येत असतील, तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्राला खगोलशास्त्रात ब्ल्यू मून म्हणण्याचा प्रघात आहे. हा ब्ल्यू मून यंदा 31 जानेवारीला दिसणार आहे. याव्यतिरिक्त यंदा तीन सूर्यग्रहण, दोन चंद्रग्रहण, उल्का वर्षावासह खगोलीय घटनांची रेलचेल ...
आदिवासी मुला-मुलींना जगाशी संवाद साधता यावा, यासाठी राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा संभाषणासाठी नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ...