आंबेगाव तालुक्यात उन्हाळी बाजरीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. ही बाजरी काही भागात फुलोन्यात तर काही ठिकाणी काढणीला आली आहे. बाजरीची राखण केली जात असल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे. ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरामध्ये असणाऱ्या पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे चालू वर्षी झपाट्याने रिकामे झाले असून या परिसरातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ...
तिकूल परिस्थितीवर मात करून पोखरी (ता. आंबेगाव) येथील सोमनाथ बेंढारी यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून शेतामध्ये यंदा उन्हाळी बटाट्याची लागवड करून ५० पिशव्या बटाट्याचे उत्पादन घेतले आहे. ...
शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर तरुणवर्गाने फळ पिकाकडे लक्ष केंद्रित करू लागला आहे. वाळुंजनगर, ता. आंबेगाव येथील तरुण शेतकरी जयेश वाळुंज याने कलिंगड शेती करण्याचा निर्णय घेत दोन लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. ...
आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी येथील प्रयोगशील शेतकरी मुरलीधर सिनलकर व शेवंता सिनलकर या दापंत्याने आपल्या २५ गुंठे शेतात बीन्स या वेल जातीच्या फरसबी ची लागवड केली असुन भरघोस उत्पादन काढले आहे. ...