आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
ब्रँड इंडॉर्समेंट अर्थात ब्रँडचा प्रचार-प्रसार करणा-या जाहिराती हे सेलिब्रिटींसाठी मोठे मार्केट आहे. ऐकून धक्का बसेल पण ईएसपीच्या ताज्या रिपोर्टनुसार, २०१७ मध्ये सेलिब्रिटीज इंडॉर्समेंट मार्केट ७९५ कोटी रूपयांचे होते. पुढच्याच वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ...