आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमातून अनन्या पांडे आणि तारा सुतारिया सिनेसृष्टित पदार्पण करतायेत. त्याच्यासोबत आणखी एक नवा चेहरा याच सिनेमातून डेब्यू करणार आहे. ...
आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करणा-या चाहत्यांची निराशा करणारी बातमी आहे. होय, ‘ब्रह्मास्त्र’साठी चाहत्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...
आलिया भट आणि रणबीर कपूर यांचे नाते आता कुणापासूनही लपलेले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आलिया व रणबीर लग्न करणार, अशी चर्चा आहे. याचवर्षांत दोघे बोहल्यावर चढणार, असेही म्हटले जातेय. पण खरे सांगायचे तर तूर्तास तरी त्यांचा लग्नाचा कुठलाही प्लान नाही. ...