आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
कियाराला खऱ्या अर्थाने लोकप्रियता एम एस धोनीः द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे मिळाली. कलंक या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात देखील कियारा एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. ...
रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण याचदरम्यान एक फक्कड बातमी आहे. होय, रणबीर कपूर लवकरच अभिनयासोबत एक साईड बिझनेस सुरु करण्याच्या विचारात आहे. ...
मंडी, सारांश, खामोश, डॅडी, सर, पेज 3, राझी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सोनी राजदान यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रात देखील त्यांनी आपले भाग्य आजमावले आहे. ...