जिल्ह्यात १ एप्रिल २०१४ ला दारूबंदी झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत २५ कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तर, तब्बल ५६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नऊ हजार आरोपींवर खटले दाखल करण्यात आले आहेत. ...
रात्र उलटून गेली मात्र संशयित वाहन नजरेस पडले नाही; मात्र सकाळच्या सुमारास एक पीकअप जीप भरधाव वेगाने घाटातून जात असल्याचे लक्षात येताच पथकाने ती रोखली. यावेळी भगवान बन्सी बढे (रा.दमण) हा वाहनचालक मद्याची वाहतूक करताना पथकाला मिळून आला. ...