अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे. Read More
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी झाली. गतवर्षीच्या तुलनेत २० ते २५ टक्के अधिक सोने खरेदी करण्यात आली. जळगावमध्ये तब्बल १० ते १२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. ...
अक्षयतृतीयेच्या दिवशी मंगळवारी विविध वस्तूंच्या खरेदीवर बक्षीसरूपात ५ ग्रॅमपर्यंत सोने व पाच टक्के कॅशबॅक देण्याची योजना रिलायन्स डिजिटलने राबविली. ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी शुभ मानली जाते. हा मुहूर्त साधत नवी मुंबईकरांनी मंगळवारी सोनेखरेदीसाठी सराफांच्या दुकानात एकच गर्दी केली होती. ...
अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या सोने खरेदीत यंदा २५ टक्के वाढ झाल्याने सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण होते. लग्नसराई, साखरपुडा, मुंजीचे मुहूर्त असल्याने ग्राहकांनी ज्वेलर्सकडे गर्दी केली होती. ...