अकोले तालुक्यातील ढोकरी येथील एका ३६ वर्षीय तरुणाला कोरनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यास प्रशासनाने नगरला तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
भंडारदरा धरणात मासेमारीसाठी गेलेल्या अकोले तालुक्यातील चिचोंडी येथील श्रावण सोमा मधे (वय ६५) या वृद्धाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. ...
दारूच्या नशेत मुलानेच बापाचा खून केला. ही घटना परिसरातील बोरी(ता. अकोले) शिवारात रविवारी (दि.१७ मे) दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. ...
मुळा नदीपात्रातील डोहात पाय घसरून पडल्याने एका दिव्यांग तरुणाचा बुडून मृत्यू झाला. येथील कोतूळेश्वर मंदिराजवळ रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भाऊराव गणपत मेंगाळ (वय २८)असे मयत तरुणाचे नाव आहे. ...
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे कोरोना रुग्णाच्या अंत्ययात्रेला राजूर (ता. अकोले) येथील काही लोक गेले होते. यातील सहा जणांना आरोग्य यंत्रणेने होमक्वारंटाईन केले आहे. या पार्श्वभूमीवर राजूरला तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. ...
घाटघर येथे एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला दोन वर्षांनी राजूर पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी रात्री जेरबंद केले. भगवान पंढरीनाथ जगनर असे या आरोपीचे नाव आहे. ...