कोतुळ परिसरात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढल्यानंतर मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारू विक्री करणा-या अड्ड्यांवर छापे टाकले. यात चार जणांना अटक करून ८२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
साम्रद -अकोले या एसटी बसचे ब्रेक निकामी होऊन स्टेअरिंगही लॉक झाल्यामुळे झालेल्या अपघातात चालकासह १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील भंडारदरा-राजूर रस्त्यावरील द-याची वाडी जवळ घडली. ...
बुधवारी रात्री आठच्या सुमारास कोतुळ येथील बाजरतळ , अण्णाभाऊ साठेनगर, बसस्थानक परिसरात रस्त्याच्या कारणांमुळे दोन गटात झालेल्या हाणामारीत आठ ते दहा जण जखमी झाले. ...
दुधाच्या कमी झालेल्या भावासंदर्भात तातडीने हस्तक्षेप करा, अन्यथा दुग्धविकास मंत्री महादेव जाणकार यांच्या दारात दूध ओतून आंदोलन छेडू, असा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ.अजित नवले यांनी दिला आहे. ...
नववर्षाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून ब्रिटिशकालीन भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रिंगरोडवरील आदिवासी पाड्यांमधे जलाशयाच्या भोवती पर्यटकांच्या निवासासाठी जवळपास दोन हजार कापडी ‘तंबू’सज्ज झाले असून, नाताळनिमित्त ‘भंडारदरा-रंधा-घाटघर-रतनग ...
कोतूळ येथे दारुबंदीसाठी महिलांनी एल्गार पुकारल्यानंतर गावात बंद केलेले दारु दुकाना शेतात सुरु करण्यात आले. महिलांना ही माहिती समजताच त्यांनी थेट हे दारु दुकान गाठून तेथे असलेल्या तळीरामांची यथेच्छ धुलाई केली आणि या परवानाधारक दारु दुकानालाही टाळे ठोक ...
गलोलीने लांडोर (मोर) ठार मारल्याप्रकरणी पिंपळगाव नाकविंदा येथील एकास बुधवारी वन विभागाच्या कर्मचा-यांनी अटक केली. त्यास ३ जानेवारी २०१८ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मधुकर पिचड व ऊस दर आंदोलनाचा इशारा दिलेल्या आंदोलकांची कारखाना कार्यस्थळावर दराबाबत बैठक झाली. मात्र ही चर्चा फिस्कटल्याने शनिवारी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकण्यावर आंदोेलक ठाम आहेत. ...