दारूच्या नशेत मुलानेच बापाचा खून केला. ही घटना परिसरातील बोरी(ता. अकोले) शिवारात रविवारी (दि.१७ मे) दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला की नाही याचे निदान अवघ्या १५ मिनिटात करणाऱ्या ‘टेस्ट किट’च्या निर्मितीत अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील संशोधक शितल रंधे-महाळुंकर हिचे मोठे योगदान आहे. ...
मुळा नदीपात्रातील डोहात पाय घसरून पडल्याने एका दिव्यांग तरुणाचा बुडून मृत्यू झाला. येथील कोतूळेश्वर मंदिराजवळ रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भाऊराव गणपत मेंगाळ (वय २८)असे मयत तरुणाचे नाव आहे. ...
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे कोरोना रुग्णाच्या अंत्ययात्रेला राजूर (ता. अकोले) येथील काही लोक गेले होते. यातील सहा जणांना आरोग्य यंत्रणेने होमक्वारंटाईन केले आहे. या पार्श्वभूमीवर राजूरला तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. ...
घाटघर येथे एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला दोन वर्षांनी राजूर पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी रात्री जेरबंद केले. भगवान पंढरीनाथ जगनर असे या आरोपीचे नाव आहे. ...
दुहेरी संकटात शेतकरी असताना दिलासा देणारी बाब म्हणजे कांदा परदेशात निर्यात होत आहे. कोतूळ (ता. अकोले) येथील तीन हजार गोणी कांदा बुधवारी (१५ एप्रिल) दुबईत विक्रीसाठी रवाना केला. ...
गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने सर्व वाहने बंद आहेत. परराज्यातील मजूर अनेक ठिकाणी अडकून पडले असल्याने आपले घर जवळ करण्यासाठी तिखीराम आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन ओतूर ते उत्तर प्रदेश हा हजार मैल प्रवास करत आहे. ...