बाळापूर : रात्री गस्त घालत असलेले बाळापूरचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांनी मार्गावर नाकेबंदी करीत असताना भरधाव वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने त्याचे वाहन विठ्ठल वाणी यांच्या अंगावर घालून त्यांना बाजुला खाली पडले. ...
अकोला : अकोला तालुक्यातील एकलारा व काटी या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये काटी-पाटी ग्रामपंचायतसाठी ८२ टक्के, तर एकलारा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ९१ टक्के मतदान झाले. ...
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील आलेगाव वन विभागांतर्गत येत असलेल्या चतारी परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याची दहशत पसरली आहे. परिसरात वावर असलेल्या या बिबट्याने २५ डिसेंबरच्या रात्री तीन हरिणांना ठार केल्याचे आढळून आल्याने, शेतकरी भयभीत झाले आहेत. ...
अकोला : अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग, अकोला ते अकोट रोडवरील चोहोट्टा बाजार तसेच पातूर घाटात झालेल्या वेगवेगळय़ा अपघातात गत चार दिवसांमध्ये ११ जणांचा बळी गेल्याचे धक्कादायक वास्तव आहे. गत चार दिवसांमध्ये अचानकच अपघातांची मालिका वाढली असून, या ...
वाडेगाव (अकोला) : बसस्थानकाच्या मागे असलेल्या दिनेश चिंचोळकर यांच्या गोदामातील चिंचेच्या झाडावर, माकडांच्या कळपाने एका गर्भार माकडिणीवर जबर हल्ला चढविला व तिला जखमी केले. ही घटना सोमवार, २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता घडली. ...
अकोट : आठ दिवसात शेती पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणार्या पुनर्वसित गावकर्यांनी मेळघाटात जाऊन हक्काची शेती वाहू द्या, शेती मिळेल तेव्हा परत येऊ, असा नारा देत पुनर्वसित गावकरी २५ डिसेंबर रोजी अमोना गेट पार करून मेळघाटात घुसले. मेळघाटात जाण्यापासून ...
तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे महावितरण कंपनीच्यावतीने सुरू असलेल्या बांधकामावरील शेतमजुराच्या पाच वर्षीय मुलाचा शौचालयाच्या टाक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता घडली. ...