देशात व राज्यात दररोज इंधनाचे दर वाढत असून, सरकार याद्वारे सामान्य जनतेची लूट करत आहे. यामुळे सरकारविरोधात जनतेतून तीव्र असंतोष उमटत आहे. सरकारच्या या इंधन दरवाढीविरोधात शहर काँग्रेसच्या वतीने गुरूवारी दुपारी ‘दे धक्का’ आंदोलन करण्यात आले. ...
तालुक्यातील १५१ पैकी ११० स्वस्त धान्य दुकानदारांवर दंडात्मक कारवाई झाल्याने दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. ७० टक्के पेक्षा कमी लाभार्थ्यांना धान्य पुरवठा झाल्या कारणाने या कारवाईला स्वस्त धान्य दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे. ...
चार वर्षे सत्ता काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या मोदी सरकारच्या कारभाराविरुध्द बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर भाकपसह डावे पक्ष व सर्व समविचारी संघटनांच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात असंतोष व्यक्त करत ...
आपला जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहासारख्या घटना घडणार नाहीत, यासाठी शासकीय यंत्रणांसोबतच सामाजिक संस्था संघटनांनी जागरुक राहावे, असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले. ...
गेल्या अनेक महिन्यांपासून राहुरी तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील वाळूच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची राजरोस लयलूट होत आहे. याकडे दुर्लक्ष करणा-या महसूल विभागाची एका नागरिकाने याबाबत थेट राज्य सरकारकडे तक्रार केल्यानंतर बुधवारी भल्या सकाळीच धावपळ उडाली. ...
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दोन कोटी रोजगार, आरक्षण अशी पोकळ आश्वासने देऊन मोदी सरकारने लोकांची फसवणूक केल्याचा आरोप यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केला. ...
अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालासंदर्भात तथागत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न होऊन आंदोलन करत कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली. ...
जिल्ह्यात वृक्षलागवड मोहिमेंतर्गत ५० लाख झाडे लावली जाणार असून, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी बैठकीत दिल्या. ...