नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर तालुका दुष्काळी घोषित करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करून निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार राहुल जगताप उपस्थित होते . ...
आम्ही आमच्या विकास कामांचे प्रस्ताव आॅगस्टमध्येच दिले होते. त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे आमचे वाटोळे झाले आहे. ...
गॅसधारकांचा शासनाने बंद केलेला रॉकेल पुरवठा, उज्ज्वला गॅस योजनेतून गॅसधारकांची वाढलेली संख्या, रॉकेलसाठी आधारसक्ती व आॅनलाईन रॉकेलविक्रीमुळे थांबलेला रॉकेलचा काळाबाजार या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून रॉकेलची मागणी झपाट्याने घसरली आहे. ...
राज्य सरकारच्या मत्स्य विभागाकडून कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डे येथे सीना धरणाच्या पायथ्याशी लाखो रूपये खर्च करून उभारलेले अद्ययावत सीना मत्स्यबीज संवर्धन केंद्र गेल्या २० वर्षांपासून कागदावरच आहे. ...
अहमदनगर शहरातील तोफखाना परिसरातील अकरा वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी सर्वधर्मिय समाजाने विराट मोर्चा काढून आरोपीला फाशीची मागणी केली. मोर्चात हजारोंच्या संख्येने महिलांसह नागरिक सहभागी झाले होते. ...
ना पायात शूज, ना धावण्यासाठी चांगला ट्रॅक, तहानलेले खेळाडू अन् कोरड्या भाकरींवरच पोटाची आग शमवून ‘अडथळ्यांची शर्यत’ रंगलेली असे चित्र शुक्रवारी नगरमधील वाडिया पार्क मैदानावर पहायला मिळाले. ...