धर्मादाय रूग्णालयांमध्ये गरीब रूग्णांना मोफत औषधोपचार मिळावेत, यासाठी राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चार रूग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे. ...
गेल्या पंधरा वर्षांतील सर्वात कमी पावसाची नोंद यंदा झाल्याने दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. त्यामुळे आॅक्टोबरअखेर टँकरने शंभरी ओलांडली असून, प्रशासनाने सुमारे २ लाख लोकांना पाण्याची व्यवस्था केली आहे. ...
जायकवाडी धरणात नगर जिल्ह्यातील धरणांचे पाणी सोडल्यास जलसंपदामंत्र्यांसह पालकमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध करू, असा इशारा देत प्रहार जनशक्ती पक्षाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. ...
राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील पारंपरिक दुष्काळी भागातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी साकारण्यात आलेल्या वांबोरी पाईप चारी योजनेचे पाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात पाथर्डी तालुक्याच्या अंतिम गावांपर्यंत पोहोचलेले नाही. ...
नगर तालुक्यातील वाळकी गावात तीन ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण केल्याने त्यांचे सदस्यपद रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष दिलीप भालसिंग व युवक नेते रामदास भालसिंग यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. ...