एलफिन्स्टन दुर्घटनेत २३ प्रवाशांचा बळी गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांच्यासह सर्व वरिष्ठ रेल्वे अधिकाºयांची उच्चस्तरीय बैठक शनिवारी बोलावली. ...
शुक्रवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास वेळी नेहमीप्रमाणे एल्फिन्स्टन आणि परळ रेल्वे स्थानकाला जोडणाºया रेल्वेच्या अतिशय अरुंद पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होती. ...
या घटनेनं राज्यातच नव्हे तर देशभरात प्रचंड दु:खं व्यक्त केलं जातंय आणि अनेकांना धक्का बसलाय की देशाच्या आर्थिक राजधानीत असं कसं काय होऊ शकतं. परंतु जे रोज मुंबईत प्रवास करतात, त्यांना अजिबात धक्का बसलेला नाहीये, कारण, ते रोजचा प्रवासच जीव मुठीत धरून ...