जि.प. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सहा रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST2021-05-28T04:29:20+5:302021-05-28T04:29:20+5:30

ठाणे : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या रुग्णवाहिका जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप ...

Z.P. Six ambulances for the primary health center | जि.प. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सहा रुग्णवाहिका

जि.प. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सहा रुग्णवाहिका

ठाणे : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या रुग्णवाहिका जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप केल्या असून गुरुवारी जिल्हा परिषदेच्या आवारात त्यांचा लोकार्पण सोहळा झाला. प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या उपस्थित रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी रवाना केल्या. यावेळी आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, कृषी,पशुसंवर्धन समिती सभापती संजय निमसे, समाजकल्याण समिती सभापती नंदा उघडा, जिल्हा परिषद सदस्य रेखा कंठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे आदी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामधील वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्र, शहापूर तालुक्यातील अघई आणि टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मुरबाड तालुक्यातील किशोर प्राथमिक आरोग्य केंद्र, शिवले आणि शिरोशी आरोग्य केंद्रांना त्या देण्यात आल्या.

Web Title: Z.P. Six ambulances for the primary health center