शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जि.प.मुख्यालय, पदाधिकारी जाणार भाड्याच्या घरात, प्रस्ताव मंत्रालयीन मंजुरीच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 01:26 IST

ठाणे येथील जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाजवळील सर्व चार इमारती पाडून त्या जागी भव्य नवीन प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे.

- सुरेश लोखंडेठाणे  - येथील जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाजवळील सर्व चार इमारती पाडून त्या जागी भव्य नवीन प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषदेची सर्व कार्यालये चरईतील एमटीएनएल इमारतीत हलवण्यात येणार आहेत. याप्रमाणेच पदाधिकाऱ्यांची निवासव्यवस्था केली जात आहे. यासाठी भाड्याची घरे शोधली जाणार आहेत. या घरभाड्याच्या रकमेच्या बंदोबस्ताचे नियोजनही जिल्हा परिषदेने आधीच केल्याचे निदर्शनात आले आहे.जिल्हा परिषदेची मुख्य इमारत धोकादायक झाली आहे. यामुळे या पावसाळ्यात ती खाली करण्यात आली. त्यातील सर्व कार्यालये या परिसरातील अन्य इमारतींमध्ये हलवली आहेत. धोकादायक झालेली ही मुख्य इमारत पाडून नवीन बांधण्याचा निर्णय याआधी घेण्यात आला. आता या आवारातील चारही इमारती पाडून एक भव्य इमारत बांधण्याच्या निर्णयावर जिल्हा परिषदेने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे या मुख्य इमारतीसह जवळचे आगरकर भवन, प्रशासकीय भवनची इमारत, पदाधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेली प्रगती इमारत आदी चार इमारती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मंत्रालयीन पातळीवरील मंजुरीसाठी प्रस्तावही देण्यात आलेला आहे.नवी प्रगती इमारतही पाडणारधक्कादायक बाब म्हणजे प्रशासकीय इमारत आणि पदाधिकाºयांच्या निवासस्थानाची प्रगती इमारत काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेल्या आहेत. या नव्या इमारती असूनही त्या पाडण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी घेतल्याची गंभीर बाबही उघडकीस आली आहे.या निवासस्थानाची इमारत पाडल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चारही सभापतींच्या निवासव्यवस्थेची समस्या निर्माण होणार आहे. यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने सर्व पदाधिकाºयांसाठी ठाणे शहरात घरे भाड्याने घेण्याचे निश्चित झाले आहे. या इमारतींचे बांधकाम बरेच वर्ष चालणार आहे.तोपर्यंत पदाधिकाºयांच्या निवासव्यवस्थेसह कार्यालयांच्या भाड्यापोटी जिल्हा परिषदेला करोडो रुपयांचा भुर्दंडही पडणार आहे. घरे व कार्यालयांच्या भाड्याच्या खर्चाला जिल्हा परिषदेने मंजुरीही दिली आहे. हा भूर्दंड सहन करावा लागणार आहे.प्रशासनाच्या हट्टापायी भाड्यापोटी बसणार लाखोंचा भुर्दंडअध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवासव्यवस्थेचे नियोजनही जिल्हा परिषदेने केले. हॉल, तीन बेडरूम व किचन असलेली घरे अध्यक्ष व उपाध्यक्षांना भाड्याने घ्यावी लागणार आहेत. प्रत्येकास सुमारे २०० चौरस मीटरचे घर लागणार आहे.तर, चार विषय समित्यांच्या सभापतींसाठी प्रत्येकी दोन बेडरूम, हॉल आणि किचन असलेल्या सुमारे १५० चौ.मी.च्या घरांचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे शहरात या १५० ते २०० चौरस मीटरच्या घरासाठी प्रत्येकी दरमहा ३० ते ६० हजार रुपये भाडे भरावे लागणार आहे.वर्षाकाठी लाखो रुपये या भाड्याच्या घरांवर जिल्हा परिषद खर्च करणार आहे. या खर्चासही तयारी दर्शवली आहे. काही वर्षांपूर्वीच बांधलेली प्रशासकीय व प्रगती इमारत पाडण्याची गरज नसतानाही पाडण्याचा हट्ट केला जात आहे.

टॅग्स :Homeघरthaneठाणे