जिल्हा परिषदेच्या १९१ शाळांना ‘क ’ श्रेणी
By Admin | Updated: May 22, 2016 01:21 IST2016-05-22T01:21:26+5:302016-05-22T01:21:26+5:30
पालघर जिल्हा परिषदेच्या शाळामधील शिक्षणाचा दर्जा कमी असल्याचे मूल्यांकन श्रेणी वरून सिध्द झाले आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत

जिल्हा परिषदेच्या १९१ शाळांना ‘क ’ श्रेणी
विक्रमगड : पालघर जिल्हा परिषदेच्या शाळामधील शिक्षणाचा दर्जा कमी असल्याचे मूल्यांकन श्रेणी वरून सिध्द झाले आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जि.प.च्या २३७ शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात आले त्यामध्ये अ श्रेणी प्राप्त शाळांची संख्या फक्त ३, ब श्रेणी प्राप्त शाळांची संख्या ४३ व क श्रेणी प्राप्त शाळांची संख्या १९१ म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक आहे. त्यावरून आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या गुणवत्तेचे शिक्षण मिळते हे स्पष्ट होते.
विक्रमगड जिल्हा परिषदेच्या शाळामधील शिक्षणाची गुणवत्ता तपासल्यानंतर विदारक चित्र दिसून येते. म्हणून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी, त्याबाबतच्या सुविधासाठी कोटयवधी रूपये खर्च केले आज आहेत मात्र शिक्षकाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याने शाळांमधील शैक्षणिक दर्जा खालावलेला दिसतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या फक्त २३७ शाळेपैकी ३ शाळांना अ श्रेणी मिळाली आहे शाळा स्वंयमूल्यमापन करतांना शालेय व्यवस्थापन, लोकसहभाग, शैक्षणिक संधी व शैक्षणिक गुणवत्ता असे एकूण २०० गुण दिले जातात या खालावलेल्या शैक्षणिक गुणवत्तेला जबाबदार कोण? ही परिस्थिती कधी सुधारणार? असा सवाल पालक करीत आहे.
याबाबत तालुका शिक्षणाधिकारी एसएस मोकाशी यांनी शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकडे चालू वर्षी भर दिला जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणले जाईल असे सांगितले.
(वार्ताहर)