शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांविना जिल्हा परिषदेची शाळा सुरू; शिक्षण विभागाचा कारभार रामभरोसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 23:13 IST

जांभूळवाडी येथील प्रकार

मुरबाड : ठाणे जिल्हा परिषदेची जांभूळवाडी येथील शाळा ही आॅनलाइन सुरू असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र बंद असल्याने ‘लोकमत’ने उजेडात आणताच शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. त्यांनी तात्काळ २ जानेवारी रोजी बंद शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती केली. परंतु शाळेला विद्यार्थी मिळत नसल्यामुळे शाळेची घंटाही वाजत नसताना दोन शिक्षक हजेरी लावत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे धिंडवडे निघत आहेत.

म्हसा केंद्रशाळे अंतर्गत असणाऱ्या जांभूळवाडी या आदिवासी वस्तीतील शाळेत एकूण २३ विद्यार्थी असताना ही वाडी बारवी धरणाची उंची वाढवल्यामुळे पाण्याखाली जात असल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शेजारी सुरक्षित ठिकाणी २५ लाख खर्च करून सुसज्ज अशी शाळेची इमारत उभारली. मात्र त्या नव्या इमारतीत परिसरातील आदिवासी पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावे म्हणून कोणत्याही प्रकारे प्रवृत्त न केल्यामुळे त्या आदिवासी बांधवांनी आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शेजारीच असणाºया सरकारी आश्रमशाळेत प्रवेश घेतला.

दरम्यान, आपल्या शाळेला विद्यार्थी नाहीत ही संधी साधत दोन्ही शिक्षकांनी मुरबाड शहराकडे पळ काढून सर्व विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत प्रवेश घेण्यासाठी दाखले दिले. परंतु एकही विद्यार्थी नसणारी व एकदाही घंटा न वाजणारी शाळा ही बंद न दाखवता ती डिसेंबर अखेर आॅनलाइन सुरू असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले असता ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले. गटशिक्षणाधिकारी कल्पना खरपडे यांनी या वृत्ताची दखल घेत तात्काळ त्या शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती केली. दोन आठवडे शिक्षक शाळेत हजेरी लावत असले तरी त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेत प्रवेश घेतला आहे. सरकारने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात सात हजार ५०० रूपये जमा केले असून त्या विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे भोजन तसेच इतर सुविधा मिळत आहेत. गेले दोन आठवडे शाळेत विद्यार्थी नसताना व शाळेची घंटा न वाजताना शिक्षकांना शाळेत हजेरी लावावी लागत आहे. त्यामुळे या शिक्षकांना व शाळेला सध्या कुणी वाली नसल्याने शिक्षण विभागाचा कारभार हा रामभरोसे चालत असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.जांभूळवाडी शाळेतील मुले ही इतरत्र विखुरली असल्याने त्या शाळेत सध्या विद्यार्थी येत नसल्याचा अहवाल आमच्याकडे उपलब्ध असून तो अहवाल परिपूर्ण नसल्याने पुढील कार्यवाही झालेली नाही. - संगीता भागवत, शिक्षणाधिकारी, प्राथमिक. 

टॅग्स :Schoolशाळा