शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

जिल्हा परिषद अध्यक्ष कामडींना २०० रुपये दंड, जिल्हाधिकारी चेंबरमध्ये विनामास्क प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:32 IST

Palghar : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ५३८ इतकी असून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात २९ हजार ९९५ तर जिल्ह्यातील अन्य ८ तालुक्यांतील ग्रामीण भागात १५ हजार ५४३ इतकी होती.

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी या  जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये विनामास्क गेल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून त्यांना २०० रुपये दंड ठोठावण्यात आला. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी त्यांना मास्क देऊन दंड वसूल केला.जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ५३८ इतकी असून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात २९ हजार ९९५ तर जिल्ह्यातील अन्य ८ तालुक्यांतील ग्रामीण भागात १५ हजार ५४३ इतकी होती. यापैकी ४४ हजार १२३ रुग्ण पूर्णतः बरे झाले असून २१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने चांगले कार्य केल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी मास्क न घालणे, सुरक्षित अंतर न ठेवणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, गर्दी टाळणे अशा हलगर्जीपणाच्या प्रवृत्ती पुन्हा वाढू लागल्याने रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन विचार करू लागले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात मंगळवारी जिल्हा परिषदेच्या वतीने ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव’ पुरस्काराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यापूर्वी अध्यक्षा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. 

कर्मचाऱ्यांची तारांबळजि.प. अध्यक्षांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना २०० रुपये दंड ठोठावला. या वेळी उपस्थित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी उपस्थित अध्यक्षा कामडी यांना मास्क दिला. या कारवाईमुळे जिल्हा कार्यालयातील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. 

टॅग्स :palgharपालघर