शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आटला, मुद्रांक शुल्काचे अनुदान घटल्याने फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 09:19 IST

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात ही वास्तवता लक्षात घेऊन २०२०-२१ चा सुधारित आणि २०२१-२२ च्या मूळ अर्थसंकल्पास सदस्यांनी काही किरकोळ सूचना करून मंजुरी दिली.

ठाणे: कोरोनाचा फटका ठाणेजिल्हा परिषदेच्या २०२०-२१ सह २०२१-२२ च्या अर्थसंकल्पालाही बसला आहे. गेल्या वर्षाचा १२४ कोटी ५९ लाख ९८ हजार ८१५ रुपयांचा अर्थसंकल्प होता. तब्बल ३९ कोटींनी कमी होऊन तो सुधारित ९६ कोटी ४७ लाख ९९ हजार ९७० झाला आहे, तर कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे २०२१-२२ च्या अर्थसंकल्पातही मुद्रांकापासून मिळणारे अनुदान मोठ्याप्रमाणात घटणार असल्याने तो ८५ कोटी ५० लाख ४६ हजार ५०० रुपयांचा झाला आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात ही वास्तवता लक्षात घेऊन २०२०-२१ चा सुधारित आणि २०२१-२२ च्या मूळ अर्थसंकल्पास सदस्यांनी काही किरकोळ सूचना करून मंजुरी दिली. २०२१-२२च्या मूळ अर्थसंकल्पात तीन वर्षांत प्राप्त झालेल्या उत्पन्नाची सरासरी, जमीन महसूल अनुदान, बिगरशेती कर, पाणीपट्टी उपकर आदी बाबींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. यावेळी सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, सभापती कुंदन पाटील, संजय निमस, नंदा उघडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.कोरोना आपत्तीमुळे जिल्हा परिषदेला राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मुद्रांक शुल्काच्या उत्पन्नात मोठी घट झाली. ते १८ कोटी ३८ लाखांनी घटले. त्याशिवाय राज्य शासनाकडून निधी व व्याजदरात कपात झाल्यामुळे जिल्हा परिषदेचा २०२०-२१ चा मूळ अर्थसंकल्प ३९ कोटींनी घटला आहे.ठाणे जिल्हा परिषदेचे राज्य शासनाकडे २०१३ पासून मुद्रांकाचे १६७ कोटी १२ लाख रुपये प्रलंबित असून, ते लवकरात मिळावे, अशी मागणी यावेळी सुभाष पवार यांनी केली. 

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद