शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

समाजवादी पार्टी लढणार जिल्हा परिषद व पंचायत समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 20:56 IST

भिवंडी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष प्रथमच उमेदवारी करणार असून, या निवडणुकीसाठी उमेदवारांना सायकल हे पक्ष चिन्ह मिळावे अशा मागणी प्रदेशाध्यक्ष अबू असिम आझमी यांनी निवडणूक अधिका-यांकडे केली आहे.

भिवंडी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष प्रथमच उमेदवारी करणार असून, या निवडणुकीसाठी उमेदवारांना सायकल हे पक्ष चिन्ह मिळावे अशा मागणी प्रदेशाध्यक्ष अबू असिम आझमी यांनी निवडणूक अधिका-यांकडे केली आहे. या उमेदवारीचा विरोधक पक्षांनी चांगलाच धसका घेतला आहे.शहरातील यंत्रमाग कारभार ग्रामिण भागातही पसरू लागल्याने त्यासाठी लागणारे कामगार देखील ग्रामीण भागात स्थायिक झाले आहेत. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार निवडून आले असून खोणी व काटई ग्रामपंचायतीवर नेहमी समाजवादीचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे या वेळी समाजवादी पार्टी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये आपले नशीब आजमविणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी खाडीपार, काटई, कांबा, कारिवली, पडघा, बोरिवली या ठिकाणी उमेदवार उभे करणार आहेत. समाजवादी पक्षांत अद्याप ग्रामीण अथवा तालुका प्रमुखाची नेमणूक केलली नाही, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सपाचे शहर जिल्हाध्यक्ष शानेरब खान व उपाध्यक्ष आरफात शेख यांनी महानगरपालिकेत समाजवादीचे वर्चस्व कमी झाल्याने ग्रामीणमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू आसीम आझमी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांना पक्षाचे सायकल हे चिन्ह मिळावे यासाठी निवडणूक अधिका-यांना लेखी पत्र दिले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत प्रथमच समाजवादी पक्ष उतरत असल्याने इतर राजकीय पुढा-यांना धक्का बसला आहे. समाजवादी पक्षाच्या उमेदवारीने काँग्रेस व राकाँपा उमेदवारांना फटका बसणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे.

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीSamajwadi Partyसमाजवादी पार्टी