अशेरी गडाची केली युवकांनी सफाई
By Admin | Updated: November 16, 2016 04:07 IST2016-11-16T04:07:32+5:302016-11-16T04:07:32+5:30
तालुक्यातील शिवतेज ग्रुप आणि विक्र ांत युवा मित्र मंडळ ओंदे यांच्या संयुक्त विद्यमानाने २२ सदस्यांनी पालघर जिल्ह्यातील एैतिहासिक अशा आशेरी

अशेरी गडाची केली युवकांनी सफाई
संजय नेवे/ विक्रमगड
तालुक्यातील शिवतेज ग्रुप आणि विक्र ांत युवा मित्र मंडळ ओंदे यांच्या संयुक्त विद्यमानाने २२ सदस्यांनी पालघर जिल्ह्यातील एैतिहासिक अशा आशेरी गडावर चढाई करून तेथील अशेरीदेवीच्या मंदिर परीसराची सफाई केली. तसेच किल्ल्याच्या अवतीभावती पडलेला कचरा-प्लास्टिक गोळा करून तो नष्ट केला. तसेच पुरातन अशा दोन तलावां भोवती वाढलेले गवत काढून टाकले. किल्ल्यावर मद्यपान करून ज्या बाटल्या अवास्तव टाकल्या होत्या त्याही गोळा केल्या.
तसेच किल्ल्यावर असलेल्या तीन पंचधातूच्या तोफा या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्या नीट रचून किल्ले संवर्धनाचा संदेश दिला. आता येथे येणाऱ्या पर्यटकांनी ही स्वच्छता कायम राखावी, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.
किल्ल्याची दुरावस्था :
मात्र या एैतिहासिक किल्ल्याची दुरावस्था झाली असून त्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. या किल्ल्याचे बुरु ज-भिंती पूर्णपणे कोसळल्या आहेत. या किल्ल्यावर आजही अखंड दगडामध्ये कोरलेली ४ ते ६ पाण्याची कुंडे असून किल्ल्याच्या मध्यभागी मोठी दोन तळी व कोरलेल्या पायऱ्या, कोरीव काम आजही अस्तित्वात आहे. गडाचे कोरीव प्रवेशद्वार भग्न अवस्थेत असूनही आजही येणाऱ्या शिवप्रेमींचे स्वागत करीत आहे.
अशेरी किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व असून येथे आजही 3 पंचधातुच्या तोफा असून त्या इतरत्र पडलेल्या आहेत. कधीही त्या चोरून नेण्याचा धोका आहे. तसेच किल्ल्याची पूर्णपणे पडझड झाली आहे. या तोफांच्या तसेच किल्ल्याच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तसेच पुरातन विभागाने याकडे लक्ष द्यावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याच प्रमाणे दुर्लक्षित अशा दोन किल्ल्याची आम्ही दरवर्षी साफसफाई करुन शासनाने याकडे लक्ष देण्यासाठी निवेदने देऊन पाठपुरावा करणार आहोत. -अमोल सांबरे, सदस्य-शिवतेज ग्रुप
भोज राजाच्या कारकीर्दीत बांधलेल्या या किल्ल्याची खूपच दयनिय अवस्था झाली आहे. तसेच पुरातन भिंती, बुरुज ढासळलेल्या अवस्थेत आहेत. पुरातन विभागाने तसेच शासनाने या किल्ल्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
- अतुल पाटील, शिवप्रेमी,
शिव इतिहास अभ्यासक