गाडीला कट मारली म्हणून युवकाची मारहाण करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:26 IST2021-09-02T05:26:33+5:302021-09-02T05:26:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - दुचाकी चालवताना कारला कट मारल्याच्या संशयावरून एका १८ वर्षाच्या युवकाची बेदम मारहाण करून निर्घृण ...

The youth was beaten to death for cutting the car | गाडीला कट मारली म्हणून युवकाची मारहाण करून हत्या

गाडीला कट मारली म्हणून युवकाची मारहाण करून हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड - दुचाकी चालवताना कारला कट मारल्याच्या संशयावरून एका १८ वर्षाच्या युवकाची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी काशीमीरा पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे.

मीररोडच्या हटकेश परिसरात रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. काही इसम हे त्यांच्या गाडीला कट मारली म्हणून कट मारणाऱ्या लाल टीशर्टवाल्या युवकाचा शोध घेत फॉर्च्युन हाईट्स इमारतीच्या समोर आले. त्यावेळी शुभम भुवड (वय १८) रा. सिल्व्हर सरिता हा लाल टीशर्ट मध्ये मित्रांसोबत उभा असल्याचे दिसून आला. गाडीला कट मारणारा शुभम असल्याचे मानून विनोद उपाध्याय (४४), आकाश हिरवे (२५), कुणाल किणी (३३), अमृत ऊर्फ सनी उपाध्याय (२५), वसीम शेख (३१), मोहमद राजू इर्षाद शेख (३२), जतीन उपाध्याय (२०) व सायस मुंढे (२०) यांनी शुभम याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याची निर्घृण हत्या केली.

मृत शुभमचे वडील शांताराम यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्यावर सोमवारी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या हत्या करणाऱ्या ८ आरोपींना अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने आरोपीना ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपींना अटक करत त्यांची वाहने जप्त केली आहेत. यातील रवी पुजारी हा आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील पुढील तपास करत आहेत.

Web Title: The youth was beaten to death for cutting the car