शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

नवी मुंबईतील तरुणांनी रस्ता चुकलेल्या आजींना २१ दिवसांनी पोहोचविले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 1:01 AM

मूळच्या कर्नाटकमधील असलेल्या कलावती सद्य:स्थितीमध्ये माहुलगावमध्ये कुटुंबीयांसोबत राहतात. १ एप्रिलला रोजच्या सवयीप्रमाणे त्या उद्यानात फिरण्यासाठी गेल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे :  मासुंदा मुंबईतील माहुलगाव परिसरातील कलावती मुलघे या ७४ वर्षांच्या आजी १ एप्रिलला उद्यानात चालण्यासाठी गेल्या. घराचा रस्ता विसरल्यामुळे त्या भटकत नवी मुंबईत पोहोचल्या. बुधवारी तुर्भे व इंदिरानगर परिसरातील तरुणांनी एपीएमसी पोलिसांच्या मदतीने आजींचा पत्ता शोधून काढला व तब्बल २१ दिवसांनंतर त्यांना घरी सुखरूप पोहोचविले. आजी घरात येताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.

मूळच्या कर्नाटकमधील असलेल्या कलावती सद्य:स्थितीमध्ये माहुलगावमध्ये कुटुंबीयांसोबत राहतात. १ एप्रिलला रोजच्या सवयीप्रमाणे त्या उद्यानात फिरण्यासाठी गेल्या. परंतु पुन्हा घरी जाताना त्या पत्ता विसरल्या. तेव्हापासून त्या विविध ठिकाणी पत्ता शाेधत फिरू लागल्या. मराठी व हिंदी बोलता येत नसल्याने त्यांना नागरिकांशी संवाद साधता येत नव्हता. बुधवारी एक रिक्षामध्ये बसून त्या तुर्भे गावात आल्या. रिक्षाचालकाने त्यांना तुर्भेत सोडून दिले. रूपेश वाडकर व अशिष पाटील, मानकेश गाडीवडार, या तरुणांनी या महिलेला एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये नेले व ती पत्ता चुकली असल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक अर्चना चिवटे व या तरुणांनी शिवसेना विभागप्रमुख महेश कोठीवाले यांच्याशी संपर्क साधला. कोठीवाले यांनी महिलेशी कन्नडमधून संवाद साधला. परंतु त्यांना पत्ता सांगता येत नव्हता. काेठीवाले यांनी होमगार्ड प्रशांत दोंडे, अविनाश शिंदे व रिक्षाचालक आशिष गुप्ता यांना सोबत घेऊन मुंबईमध्ये चेंबूर, चुनाभट्टी व इतर परिसरात पत्ता शोधण्यास सुरुवात केली.

आजींकडून जुजबी माहिती घेऊन पत्ता शोधण्यासाठी सुरुवात केली. बुधवारी मध्यरात्री हे सर्व माहुलगाव येथे पोहोचले. तो परिसर आजींना परिचयाचा वाटला. पिठाच्या गिरीपाशी घर असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांनी पिठाची गिरणी शोधली व तेथून पुढील आजींनी सर्वांना घरापर्यंत नेले. पहाटे साडेचार वाजता घराचा दरवाजा उघडला. घरातील सदस्यांनी दरवाजा उघडला व समोर आजींना पाहताच सर्वांनी रडायला सुरुवात केली. घरातील सदस्यांनी सर्वत्र शोधाशोध केली होती. पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दिली हाेती. २० दिवस होऊन गेल्यामुळे सर्व हतबल झाले होते. नवी मुंबईमधील तरुणांचे आजी व घरातील सर्वांनीच आभार मानले.

मूळ कर्नाटकमधील असलेल्या आजींना त्यांच्या कुटुंंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस, तुर्भेमधील तरुण या सर्वांनी प्रयत्न केले. चेंबूर, चुनाभट्टी परिसरात शोध घेतल्यानंतर अखेर माहुलगावमधील आजीचे घर शोधण्यात आम्हाला यश आले. आजींना त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घालून दिल्याचे समाधान वाटत आहे.- महेश कोठीवाले, विभागप्रमुख, शिवसेना