नगरसेवकाच्या फार्महाऊसवर युवक बुडाला

By Admin | Updated: July 3, 2017 04:55 IST2017-07-03T04:55:40+5:302017-07-03T04:55:40+5:30

गोराईला एका फार्महाऊसवर पिकनिकसाठी गेलेल्या मेडिकल असोसिएशनच्या सदस्याचा स्विमींग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला.

The youth lost the farmhouse at the farmhouse | नगरसेवकाच्या फार्महाऊसवर युवक बुडाला

नगरसेवकाच्या फार्महाऊसवर युवक बुडाला

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : गोराईला एका फार्महाऊसवर पिकनिकसाठी गेलेल्या मेडिकल असोसिएशनच्या सदस्याचा स्विमींग पूलमध्ये बुडून
मृत्यू झाला.
नगरसेवक अ‍ॅड. सुहास रकवी यांचे गोराई येथे फार्महाऊस आहे. भार्इंदर मेडिकल असोसिएशनचे  सर्व सदस्य पिकनिकसाठी रकवी यांच्या फार्म हाऊसवर गेले होते. भार्इंदरच्या जेसलपार्क येथील अरिहंत मेडिकल दुकानाचा चालक कुणाल लुणिया (३०) हा सायंकाळी तेथील स्विमींग पूल मध्ये बुडून मरण पाावला.
गोराई पोलिसांनी बुडून मरण पावल्याची घटना घडल्याचे सांगितले. मात्र माहिती देण्यास  नकार दिला. स्विमींग पूलमध्ये असतानाच कुणाल याला ह्रदय विकाराचा झटका आल्याने  मृत्यू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे  आहे. परंतु गोराई पोलीस ठाणे
व पोलीस निरीक्षक शिवाजी  जमदाडे यांच्याशी संपर्क साधला असता मृत्यूचे नेमके कारण त्यांनी सांगितले नाही.

Web Title: The youth lost the farmhouse at the farmhouse