उल्हासनगरात तरुण मोटरसायकलसह खड्ड्यात; भुयारी गटार योजनेमुळे रस्त्याची दुरवस्था 

By सदानंद नाईक | Updated: March 3, 2025 22:56 IST2025-03-03T22:56:03+5:302025-03-03T22:56:28+5:30

खोदलेल्या ६ फुटी खड्ड्यात तरुण मोटरसायकलसह पडून जखमी झाला.

Youth in pit with motorcycle in Ulhasnagar | उल्हासनगरात तरुण मोटरसायकलसह खड्ड्यात; भुयारी गटार योजनेमुळे रस्त्याची दुरवस्था 

उल्हासनगरात तरुण मोटरसायकलसह खड्ड्यात; भुयारी गटार योजनेमुळे रस्त्याची दुरवस्था 

सदानंद नाईक, उल्हासनगर : रविवारी रात्री सपना गार्डन ते फार्निचर मार्केट रस्त्यात खोदलेल्या ६ फुटी खड्ड्यात तरुण मोटरसायकलसह पडून जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी त्याला मदतीचा हात देत खड्ड्यातून मोटरसायकलसह बाहेर काढून ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे. 

उल्हासनगरात भुयारी गटार योजनेचे काम सुरु असल्याने, गटारीचे पाईप टाकण्यासाठी सपना गार्डन ते फार्निचर रस्त्यावर गटार जेम्बर बनविण्यासाठी खड्डा खोदण्यात आला. मात्र सुरक्षितात म्हणून खड्ड्या भोवती सबंधित ठेकेदाराने बरेकेट्स लावले नाही. रविवारी रात्री आठ वाजता ऐक तरुण मोटरसायकलसह गटारीच्या चेंबर खड्ड्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी स्थानिक नागरिक व दुकानदार धावून गेले. नागरिकानी त्याच्यासह मोटरसायकल खड्ड्यातून बाहेर काढली.

खड्ड्यात पडल्याने तरुण झाला जखमी होऊन मोटरसायकलचे नुकसान झाले. गेल्या आठवड्यात रस्त्यातील खड्ड्यामुळे एक तरुण डॉक्टर व एक इसमाचा खोदलेल्या नालीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. महापालिका असे किती जणांचे बळी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे घेईल? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

Web Title: Youth in pit with motorcycle in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.