रॉक क्लाइंबिंग करताना 30 फुटावरून तरुण जखमी; ठाण्यातील घटना
By अजित मांडके | Updated: March 8, 2024 16:41 IST2024-03-08T16:41:09+5:302024-03-08T16:41:55+5:30
ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेचा फोन वर रॉक क्लाइंबिंग करताना अंदाजे 30 फूट उंची वरून खाली पडून जखमी झाल्याची माहिती देण्यात आली.

रॉक क्लाइंबिंग करताना 30 फुटावरून तरुण जखमी; ठाण्यातील घटना
ठाणे : मानपाडा, टिकुजीनी वाडी वॉटर पार्क जवळ या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क येथे डोंगरावरती रॉक क्लाइंबिंग करत असताना मुलुंड, स्वप्ननगरी येथील रोशन शहा (20) हा तरुण अंदाजे 30 फूट उंची वरून खाली पडून जखमी झाली आहे. ही घटना शुक्रवारी साडेआठ वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. त्याच्यावर ठाण्यातील बेथनी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेचा फोन वर रॉक क्लाइंबिंग करताना अंदाजे 30 फूट उंची वरून खाली पडून जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. तातडीने ठामपा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी- कर्मचारी आणि आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर रोशन शहा यांना स्थानिक लोक व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने स्ट्रेचरच्या साह्याने डोंगरावरून खाली आणून बेथनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून त्यांना डोक्याला, छातीला, कमरेला, हाताला दुखापत झाली आहे. तसेच रोहन आणि अन्य एक असे दोघे रॉक क्लाइंबिंग करण्यासाठी गेले होते. मात्र तो कोण होते. त्याच्याबाबत काही समजू शकलेले नाही. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.