शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील गोदाम दुर्घटनेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 16:28 IST

Bhiwandi godown building collapse : मृतांची संख्या दोन वर तर गोदाम मालकांसह देखभाल करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल 

ठळक मुद्देधनाढ्य विकासक स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकसित करण्यासाठी घेवून वर्षानुवर्ष त्यांच्या हिश्याचे विकसित बांधकाम देण्यास टाळाटाळ करत असतात , त्यातच जे विकसित बांधकाम शेतकऱ्यांना दिले जाते ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे.

नितिन पंडीतभिवंडी - भिवंडी तालुक्यातील दापोडे ग्रामपंचायत हद्दीतील हरिहर कंपाऊंड येथे सोमवारी सकाळी तळ अधिक एक मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या  दुर्घटनेत ढिगाऱ्या खालून तब्बल सात तासांनी जखमी अवस्थेत बाहेर काढलेल्या ऋतिक सुरेश पाटील ( वय १९,  रा.डुंगे ) याची ठाणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली असून या दुर्घटनेत मृतांची संख्या दोन वर पोहचली आहे . या दुर्घटने नंतर ग्रामीण भागातील गोदाम पट्ट्यातील बांधकामांचा तसेच अनधिकृत बांधकाम व निकृष्ठ बांधकामांचा प्रश्न चर्चेत आला असताना स्थानिक नारपोली पोलिसांनी या दुर्घटनेस जबाबदार धरत मूळ गोदाम मालक सूर्यकांत विठ्ठल पाटील ,रामचंद्र शांताराम पाटील ,महादेव शांताराम पाटील यांसह या गोदामांच्या देखभालीची जबाबदारी असणाऱ्या व्ही आय बिल्डकॉम प्रा.लि. या विकासक कंपनीस जबाबदार धरत त्यांच्या विरोधात विविध कलमानुसार सोमवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल केला आहे . या दुर्घटनेत एकूण बारा गोदामांचे नुकसान झाले असून दोन जणांच्या मृत्यु सह पाच जण जखमी झाले आहेत.          

भिवंडीतील ग्रामीण भागात गोदाम पट्टा झपाट्याने वाढला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी विकासक आपल्या ताब्यात घेऊन सुस्थितीतील गोदामे स्वतःच्या ताब्यात घेऊन त्याच्या विक्रीतून बक्कळ पैसा कमावून स्थानिक जमीन मालकांना कमकुवत बांधकामे असलेली मालमत्ता देऊन त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत असून या परिसरातील बांधकामांवर एमएमआरडीए प्रशासनाचे लक्ष नसल्याने मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होऊन स्थानिक शेतकरी जमीन मालक व शासन यांची फसवणूक करीत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. विकासकांच्या या मनमानी कारभाराला आळा घालणे गरजेचे असून एमएमआरडीए प्राधिकरणासह महसूल विभागाने त्यासंदर्भात लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे . 

भिवंडीमध्ये गोदाम कोसळून एकाचा मृत्यू , सहा जण जखमी

 

हि दोस्ती तुटायची नाय; मित्राने आवाज दिला नसता तर आज मी वाचलो नसतो  

        

दरम्यान धनाढ्य विकासक स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकसित करण्यासाठी घेवून वर्षानुवर्ष त्यांच्या हिश्याचे विकसित बांधकाम देण्यास टाळाटाळ करत असतात , त्यातच जे विकसित बांधकाम शेतकऱ्यांना दिले जाते ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. सोमवारी दापोडा येथे घडलेली घटना देखील तशीच आहे. गोदाम पडल्यावर खऱ्या अर्थाने असे कमकुवत बांधकाम करणारे ठेकेदार व वास्तुविशारद यांचेवर गुन्हे दाखल करणे अभिप्रेत असताना पोलीस यंत्रणा मात्र स्थानिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करत आहेत हे दुर्दैवी आहे. स्थानिक भूमिपुत्रांमधे असंतोष पसरवण्याचे काम पोलीस प्रशासन करीत आहे. या अन्यायाविरद्ध आम्ही नक्कीच भूमिपुत्र शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून देऊ प्रसंगी रस्त्यावर देखील उतरू अशी प्रतिक्रिया आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे अध्यक्ष अँड.भारद्वाज चौधरी यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीDeathमृत्यूBuilding Collapseइमारत दुर्घटनाhospitalहॉस्पिटल