कल्याण येथे व्हीडिओ बनवून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 05:41 IST2018-12-08T05:41:40+5:302018-12-08T05:41:42+5:30

नेतिवली टेकडी येथे राहणाऱ्या रोहित परदेशी या तरुणाने गुरुवारी रात्री मोबाइलवर व्हीडिओ तयार करून रेल्वे रूळाखाली आत्महत्या केली.

 Youth commits suicide by making a video at Kalyan | कल्याण येथे व्हीडिओ बनवून तरुणाची आत्महत्या

कल्याण येथे व्हीडिओ बनवून तरुणाची आत्महत्या

कल्याण : नेतिवली टेकडी येथे राहणाऱ्या रोहित परदेशी या तरुणाने गुरुवारी रात्री मोबाइलवर व्हीडिओ तयार करून रेल्वे रूळाखाली आत्महत्या केली. त्याचा मृतदेह कल्याण पत्रीपुलानजीक रूळावर आढळला. रेल्वे पोलिसांनी मृतदेह सरकारी रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविला आहे.
‘माझ्या भावाशिवाय माझे या जगात कोणी नाही. त्यामुळे माझी मालमत्ता त्याला द्यावी. माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये. मी काढलेला हा व्हीडिओ पोलिसांच्या हाती लागता कामा नये. मी आज रात्र पूर्णपणे जागा राहणार आहे. उद्याचा सूर्य मी पाहणार नाही. माझे नाव रोहित परदेशी आहे,’ असे त्याने आत्महत्येपूर्वी मोबाइलमध्ये बनवलेल्या व्हीडिओमध्ये म्हटले आहे.
शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह रेल्वे रूळात आढळला. त्याच्याकडील मोबाइल जप्त केला असून, त्यात हा व्हीडिओ आढळला. रोहितच्या आत्महत्येमागील कारणाचा विविध अंगाने पोलीस तपास करत आहेत.

Web Title:  Youth commits suicide by making a video at Kalyan