तरुणीची हत्या करत तरुणाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:00 IST2019-07-20T00:00:25+5:302019-07-20T00:00:28+5:30

रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या नीलम गेस्ट हाऊस मध्ये रात्री साडे नऊच्या सुमारस एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Youth commits suicide by killing young woman | तरुणीची हत्या करत तरुणाने केली आत्महत्या

तरुणीची हत्या करत तरुणाने केली आत्महत्या

कल्याण : रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या नीलम गेस्ट हाऊस मध्ये रात्री साडे नऊच्या सुमारस एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या लॉज मध्ये एका तरुणाने गळफास घेतलेल्या अवस्थेत तर त्याच रूममध्ये एक तरुणी मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मयत तरुणीचे नाव प्रतिमा प्रसाद (20, रा. मुंबई) असून तरुणाचे नाव अरुण गुप्ता (20 रा. आजमगड) असे आहे. प्रतिभाची हत्या करत अरुणने स्वतः आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात सामोर आले असून पोलिसानी या संपूर्ण घटनेचा तपास सुरु केला आहे

Web Title: Youth commits suicide by killing young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.