संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तरुणाची आत्महत्या
By जितेंद्र कालेकर | Updated: May 26, 2024 23:43 IST2024-05-26T23:43:40+5:302024-05-26T23:43:53+5:30
चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा: झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तरुणाची आत्महत्या
ठाणे: टिकूजिनी वाडी जवळील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये प्रितम राकेश झिमन (२४ वय, रा. कोकणीपाडा, ठाणे) या तरुणाने झाडाला आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आली आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती चितळसर पोलिसांनी रविवारी दिली.
ठाण्याच्या मानपाडा भागातील टिकुजिनी वाडी पार्कजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील डोंगरावर प्रितम याचा मृतदेह २६ मे रोजी दुपारी २.५० वाजण्याच्या सुमारास झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळला. ही माहिती मिळताच चितळसर पोलिसांसह वन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह डोंगरावरुन खाली आणला. उत्तरीय तपासणीसाठी
हा मृतदेह चितळसर पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. त्याने आत्महत्या केली की त्याचा कोणी खून केला, याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.