शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तीने वाढदिवसाचा केक कापणाऱ्या तरुणाला ठाण्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 00:16 IST

आपल्या वाढदिवसाचा केक टोकदार गुप्तीने कापणाºया देवेंद्र कदम (२१, रा. धर्मवीरनगर, ठाणे) या तरुणाला चितळसर पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्याच्याकडून ही गुप्तीही हस्तगत करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे चितळसर पोलिसांची कारवाईव्हिडिओ क्लिप झाली व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आपल्या वाढदिवसाचा केक टोकदार गुप्तीने कापणाºया देवेंद्र कदम (२१, रा. धर्मवीरनगर, ठाणे) या तरुणाला चितळसर पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्याच्याकडून ही गुप्तीही हस्तगत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या घटनेची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत ही कारवाई केली आहे.ठाण्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी मनाई आदेश लागू केला आहे. याच मनाई आदेशानुसार कोणालाही एखादे हत्यार बाळगणे किंवा विक्री करण्याची मनाई आहे. असे असूनही ८ जून २०२१ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास धर्मवीरनगर येथील इमारत क्रमांक २३ च्या बाजूला असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर देवेंद्र याने त्याच्या मित्रांसह गुप्तीने वाढदिवसाचा केक कापला. या संपूर्ण प्रकाराची व्हिडिओ क्लिपही सोशल मिडियाद्वारे व्हायरल झाली होती. याचीच गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ आणि उपनिरीक्षक डी. सी. केदार यांच्या पथकाने १२ जून रोजी रात्री कथित आरोपीचा शोध घेऊन मनाई आदेशाचा भंग केल्याच्या तसेच भारतीय हत्यार कायद्याच्या कलमाखाली अटक केली आहे. त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.* सोशल मिडियात क्लिप टाकणे पडले महागात..यातील देवेंद्र कदम याने गुप्तीने केक कापल्याचा व्हिडिओ फेसबुकवर टाकला होता. हीच क्लिप व्हॉटसअ‍ॅपद्वारे व्हायरल केली. तसेच स्वत:च्या व्हॉटसअ‍ॅप स्टेटसलाही हीच क्लिप ठेवली. याचा चुकीचा संदेश समाजमाध्यमांमध्ये जात असल्याने पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतल्याचे सहायक पोलीस निरीक्षक वाघ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र