शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
4
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
5
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
6
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
8
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
9
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
10
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
11
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
12
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
13
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
14
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
15
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
16
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
17
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
18
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
19
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
20
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा

नाल्यात वाहून गेलेला तरुण बेपत्ता, शोध पथकाचे कार्य सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 4:21 AM

पूर्वेतील नांदिवली नाल्यात मंगळवारी रात्री बुडालेल्या हर्षद जिमकल (२४) याचा शोध बुधवारीही लागू शकलेला नाही. केडीएमसीचे अग्निशमन दलाचे पथक, ठाणे महापालिकेचे आपत्ती प्रतिसाद पथक यांनी नाला, त्याच्याशेजारील दलदल तसेच झाडीझुडपात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केले.

डोंबिवली - पूर्वेतील नांदिवली नाल्यात मंगळवारी रात्री बुडालेल्या हर्षद जिमकल (२४) याचा शोध बुधवारीही लागू शकलेला नाही. केडीएमसीचे अग्निशमन दलाचे पथक, ठाणे महापालिकेचे आपत्ती प्रतिसाद पथक यांनी नाला, त्याच्याशेजारील दलदल तसेच झाडीझुडपात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांना यश आले नाही. दरम्यान, हर्षदला वाचवण्यासाठी गेलेलाही बुडाल्याच्या वृत्ताचा यंत्रणांनी इन्कार केला आहे.पूर्वेतील गांधीनगर परिसरातील मुक्ताई इमारतीत राहणारा हर्षद आयटीआयमध्ये शिक्षण घेत आहे. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास क्लासवरून तो घरी परतत होता. या वेळी नांदिवली नाल्याजवळ तो लघुशंकेसाठी उभा राहिला असता, त्याचा तोल गेला. त्यामुळे तो नाल्यात पडला आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी मानपाडा पोलीस आणि अग्निशमन दलास कळवली. मात्र, पाण्याचा जोरदार प्रवाह, रात्रीचा अंधार आणि पाऊस, यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी नाल्यात उतरून दोरीद्वारे रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला.ठाणे महापालिकेने आपत्ती प्रतिसाद पथक बुधवारी दुपारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलासह त्यांनी हर्षदचा शोध घेण्यास सुरुवात केली. आयरे गाव परिसरात हा नाला खाडीला मिळतो. तिथपर्यंत ही पथके गेली. तसेच दलदल आणि झाडीझुडपातही हर्षदचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पथकांना यश आले नाही.ठाणे व आसपासच्या परिसरातील वाहून गेलेल्या मुलांना शोधण्यात पटाईत असलेल्या खडवली येथील शेतकऱ्यांच्या १० मुलांना कल्याण तहसीलदारांनी पाचारण केले होते.रबरबोट, स्पीडबोटशोधपथकात अद्ययावत तीन रबर बोटी, रस्सी, टायर ट्युबचा वापर करत आहे. आयरे गावानजीक दाखल झालेले ठाण्याचे पथक, पोलिसांनी खाडीकिनारी हर्षदचा शोध घेतला.नाल्यावर उभारलेल्या इमारती, चाळी आणि बंगल्यांना नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. तसेच, त्या तोडण्यात येणार असून संबंधितांवर एमआरटीपीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.- गोविंद बोडके, आयुक्त, केडीएमसी 

टॅग्स :thaneठाणे