विजेच्या झटक्याने तरुण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST2021-06-16T04:52:58+5:302021-06-16T04:52:58+5:30

मुंब्राः टेरेसवरून गेलेल्या विद्युत वायरच्या संपर्कात आल्याने मोहम्मद रियाज (२२) हा तरुण दुसऱ्या माळ्यावरून थेट जमिनीवर आदळल्यामुळे गंभीर ...

Young seriously injured by electric shock | विजेच्या झटक्याने तरुण गंभीर जखमी

विजेच्या झटक्याने तरुण गंभीर जखमी

मुंब्राः टेरेसवरून गेलेल्या विद्युत वायरच्या संपर्कात आल्याने मोहम्मद रियाज (२२) हा तरुण दुसऱ्या माळ्यावरून थेट जमिनीवर आदळल्यामुळे गंभीर झाला. ही घटना सोमवारी रात्री येथील सैनिकनगर परिसरात घडली. त्याला उपचारासाठी नवी मुंबईतील ऐरोली येथील रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, परिसरातील विद्युत केबल वाहून नेणारा एक खांब चार दिवसांपूर्वी वाकडा झाला होता. त्यामुळे त्यावर लोंबकळलेली वायर युसूफ चाळ या दोन मजली इमारतीच्या टेरेसच्या जवळून गेली होती. वायरमुळे दुर्घटना घडू शकते, अशी माहिती नगरसेवक शाह आलम यांनी टोरंटच्या अधिकाऱ्यांना चार दिवसांपूर्वी दिली होती. परंतु, त्यांनी यावर तातडीने कारवाई न केल्यामुळे सोमवारची घटना घडल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Web Title: Young seriously injured by electric shock