नौपाड्यातील आगीमध्ये चित्रकार तरुण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:38 IST2021-02-12T04:38:19+5:302021-02-12T04:38:19+5:30

ठाणे : नौपाड्यातील सम्राट या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक १९ मध्ये गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अचानक आग ...

Young painter seriously injured in fire in Naupada | नौपाड्यातील आगीमध्ये चित्रकार तरुण गंभीर जखमी

नौपाड्यातील आगीमध्ये चित्रकार तरुण गंभीर जखमी

ठाणे : नौपाड्यातील सम्राट या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक १९ मध्ये गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये मोहित मनोहर जयपाल (२२) हा चित्रकार तरुण ७५ टक्के होरपळून जखमी झाला. त्याच्यावर ऐरोलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

ही सदनिका रजनी मिसळ यांची असून ती त्यांनी मनोहर जयपाल यांना भाडेतत्त्वावर दिली आहे. दुपारी मोहित हा एका कागदावर चित्र रंगवीत होता. तिथे जवळच थिनर, मेणबत्ती अशी सामग्रीही होती. त्यामुळे नेमकी आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. मात्र, आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी, तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. एक फायर इंजिन आणि एका रेस्क्यू वाहनाच्या मदतीने तासाभराच्या अंतराने ही आग आटोक्यात आणण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Young painter seriously injured in fire in Naupada