कोविशिल्ड लस घेतल्यावर तरुणाला झाला त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:42 IST2021-07-30T04:42:13+5:302021-07-30T04:42:13+5:30

कल्याण : डोंबिवलीनजीकच्या दावडी परिसरात राहणाऱ्या भावेश चकोर (२४) याने ममता रुग्णालयात कोविशिल्डची लस घेतल्यानंतर त्याला त्रास झाला. त्याला ...

The young man suffered after taking the Covishield vaccine | कोविशिल्ड लस घेतल्यावर तरुणाला झाला त्रास

कोविशिल्ड लस घेतल्यावर तरुणाला झाला त्रास

कल्याण : डोंबिवलीनजीकच्या दावडी परिसरात राहणाऱ्या भावेश चकोर (२४) याने ममता रुग्णालयात कोविशिल्डची लस घेतल्यानंतर त्याला त्रास झाला. त्याला पक्षाघातासारखी लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे त्याला एमआरआय करण्यासाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या रिपोर्टमध्ये काय निष्पन्न होते, हे पाहून त्यानंतर ममता रुग्णालयाकडून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयास प्रशासनास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता प्रवेशद्वारावर पदाधिकाऱ्यांचा रुग्णालय कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला.

भावेश इंजिनीअर असून, तो पुण्यातील कंपनीत कामाला आहे. त्याने रविवारी ममता रुग्णालयातून कोविशिल्ड लस घेतली. त्याला रविवारी सायंकाळी ताप आला. त्यानंतर त्याचा डोळा आणि तोंड एका बाजूने थरथरू लागल्याचे जाणवू लागले. त्यामुळे त्याने रुग्णालय प्रशासनाकडे धाव घेतली. रुग्णालय प्रशासनाने त्याला महापालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात एमआरआय काढण्यासाठी पाठविले आहे. त्याचा रिपोर्ट आल्यावर पुढील उपचार केले जातील, असे सांगितले आहे.

यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, भावेशला रविवारी ज्या स्टॉकमधून लस दिली गेली, तीच लस अनेकांना दिली गेली. भावेशला त्रास झाल्याची पहिलीच केस आहे. या प्रकरणी महापालिकेस कळविले आहे. भावेशचा एमआरआय रिपोर्ट आल्यावर नक्की काय आहे, ते स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, हा प्रकार कळताच भाजपचे पदाधिकारी नंदू परब आणि मनीषा राणे यांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालय प्रशासनाने त्यांना प्रवेशद्वाराजवळच अडविले. त्यामुळे पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यात वाद झाला.

-------------------------

Web Title: The young man suffered after taking the Covishield vaccine