वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:40 IST2021-03-19T04:40:33+5:302021-03-19T04:40:33+5:30

मुंब्रा : दुचाकीला लाॅरीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मुजाहीद फकी या २५ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ...

Young man killed in vehicle crash | वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

मुंब्रा : दुचाकीला लाॅरीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मुजाहीद फकी या २५ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -४ वर घडली. फकी मुंब्र्यातील रशीद कपाऊंड परिसरात राहत होता. तो आणि त्याचा मित्र दुचाकीने घरी जात असताना पनवेल रस्त्याजवळील एका पेट्रोल पंपासमोर लाॅरीने मागून धडक दिली. त्यामुळे संतुलन बिघडल्याने खाली पडलेल्या फकीच्या डोक्यावरून लाॅरीचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून लाॅरी चालकाविरोधात शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Young man killed in vehicle crash