तरुणाने मारली मुंब्र्यातील खाडीमध्ये उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST2021-07-14T04:45:36+5:302021-07-14T04:45:36+5:30
मुंब्राः येथील ठाकूरपाडा परिसरातील ताहिरा अपार्टमेंट या इमारतीच्या तळमजल्यावरील रूम नंबर २ मध्ये राहणाऱ्या अरबाज शेख या २२ ...

तरुणाने मारली मुंब्र्यातील खाडीमध्ये उडी
मुंब्राः येथील ठाकूरपाडा परिसरातील ताहिरा अपार्टमेंट या इमारतीच्या तळमजल्यावरील रूम नंबर २ मध्ये राहणाऱ्या अरबाज शेख या २२ वर्षाच्या तरुणाने मंगळवारी दुपारी अग्निशमन केंद्राच्या मागे असलेल्या चुहा ब्रिजवरून खाडीत उडी मारली. सोमवारी रात्रीपासून तो घराबाहेर होता. त्यानंतर त्याला शोधून त्याचा मित्र त्याला रिक्षातून घरी नेण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचवेळी त्याने धावत्या रिक्षातून उडी मारून ब्रिजच्या दिशेने धूम ठोकून उडी मारली. कथित प्रेमप्रसंगातून त्याने हे पाऊल उचलल्याची माहिती त्याच्या मित्राने दिली. दरम्यान, समुद्रामध्ये भरतीची वेळ असल्याने खाडीमध्ये शोधकार्य करणे शक्य नसल्याने संध्याकाळी मुंब्रा पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने शोधमोहिम थांबविली असल्याची माहिती ठामपाच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख अधिकारी संतोष कदम यांनी दिली.