ठाण्यात उन्मळून पडलेल्या झाडामुळे तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:19 IST2021-02-28T05:19:12+5:302021-02-28T05:19:12+5:30

ठाणे : येथील तीनहातनाका परिसरातील सेवा (सर्व्हिस) रस्त्यावरील उन्मळून पडलेल्या झाडामुळे नीलेश शिंदे हा ३२ वर्षीय तरुण किरकोळ जखमी ...

Young man injured in uprooted tree in Thane | ठाण्यात उन्मळून पडलेल्या झाडामुळे तरुण जखमी

ठाण्यात उन्मळून पडलेल्या झाडामुळे तरुण जखमी

ठाणे : येथील तीनहातनाका परिसरातील सेवा (सर्व्हिस) रस्त्यावरील उन्मळून पडलेल्या झाडामुळे नीलेश शिंदे हा ३२ वर्षीय तरुण किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. इंदिरानगर येथील रहिवासी असलेल्या नीलेशला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच रस्त्यावर पडलेले झाड तातडीने हटविल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

ठाण्यातील तीनहातनाका येथील एलआयसी इमारतीजवळ असलेल्या सेवा रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी दुपारी या रस्त्यावरील गुलमोहराचे झाड मुळानिशी उन्मळून पडले. त्या वेळी तेथून जाणारा नीलेश हा जखमी झाला. त्याला उजव्या हाताला दुपाखत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच ठामपा अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी- कर्मचारी आणि पोलिसांनी धाव घेऊन ते झाड तोडून रस्त्यावरून हटवून तो रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या वेळी अग्निशमन दलाची गाडी आणि एक रेस्क्यू वाहन पाचारण केल्याचे आपत्ती कक्षाने सांगितले.

Web Title: Young man injured in uprooted tree in Thane