शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

गरब्यामध्ये तरुणाईचा सळसळता उत्साह, दिवसा अभ्यास, रात्री फेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 00:48 IST

आचारसंहितेमुळे नवरात्रोत्सवात राजकीय बॅनरबाजी गायब असली, तरी तरुणाईमधील उत्साह तसुभरही कमी झालेला नाही. शहरात विविध मंडळांच्या गरबा, दांडियांंचे तरुणाईमध्ये आकर्षण आहे.

- जान्हवी मोर्येडोंबिवली : आचारसंहितेमुळे नवरात्रोत्सवात राजकीय बॅनरबाजी गायब असली, तरी तरुणाईमधील उत्साह तसुभरही कमी झालेला नाही. शहरात विविध मंडळांच्या गरबा, दांडियांंचे तरुणाईमध्ये आकर्षण आहे. पहिल्या सत्राच्या परीक्षांचा काळ असला, तरी विद्यार्थी दिवसभर अभ्यास करून गरब्यासाठी खास वेळ काढत आहेत. गरब्याला बॉलिवूड-टीव्ही मालिकांचे कलाकार, गायक हजेरी लावत असून त्यांना पाहण्यासाठीही गर्दी होत आहे. ही गर्दी नियंत्रित करताना आयोजकांची दमछाक होत असून शनिवारी, रविवारी सुटी असल्यामुळे गर्दी नियंत्रित करण्यासाठी आयोजक खास नियोजन करण्यात गुंतल्याचे दिसत आहेत.गरबा खेळण्यासाठी तरुण-तरुणी खास पेहराव करून येत आहेत. शाळा-कॉलेजच्या परीक्षा सुरू असल्या तरी त्यांचा उत्साहावर काहीच परिणाम झालेला नाही. दिवसा अभ्यास आणि रात्री गरबा असे अभ्यासाचे वेळापत्रकच बनवले असल्याचे तरुण-तरुणी सांगत आहेत. अदिती ठक्कर म्हणाली की, आमची परीक्षा सुरू आहे. दिवसभर अभ्यास करतो आणि रात्री गरब्यासाठी वेळ काढतो. त्यामुळे अभ्यासही होतो आणि गरब्याचा आनंदही लुटता येतो. अभ्यास केल्यामुळे पालकही दांडिया खेळण्यापासून रोखत नाही. त्यामुळे परीक्षा आणि पाऊस या दोन्हींचा गरबाप्रेमींवर काहीच परिणाम झाला नाही.बड्या मंडळांच्या गरब्याला जास्त गर्दी होत असल्याने छोट्या मंडळांकडील ओघ कमी झाला असल्याचे काही मंडळांचे म्हणणे आहे. मोठ्या मंडळांतर्फे आयोजित दांडियाला गर्दी होत असल्याने अनेकांना प्रवेश नाकारला जात असल्याने आल्यापावली परत फिरावे लागत आहे. त्यामुळे काही गरबाप्रेमी पैसे घ्या पण प्रवेश द्या, असे सांगत आहेत. डोंबिवलीत बड्या गरब्यासाठी बाहेरूनही तरुण-तरुणी येत असून त्यांना रेल्वेस्थानकात इच्छितस्थळी जाण्यासाठी रिक्षा मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तसेच, गरब्याच्या परिसरात वाहतूककोंडीही होत आहे. स्वयंसेवकांनी काही दांडियाप्रेमींना आत सोडत गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. भगवती भानुशाली यांना एका ठिकाणाहून प्रवेश न मिळाल्याने परतावे लागले.काही ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त पाककला, रांगोळी, मेहंदी अशा विविध स्पर्धा घेतल्या जात आहेत. तसेच गरब्यामध्ये महिला आणि मुलींनाच प्रवेश दिला जातो. येथे ओळखीतल्या पुरुषांनाच प्रवेश दिला जातो. १० वाजेपर्यंतच गरब्याला परवानगी असली, तरी वेळेचे बंधन पाळूनही गरबाप्रेमी आनंद लुटताना दिसत आहेत. डोंबिवलीतील एका मंडळाने यंदा गरबा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. गरब्यावर होणाऱ्या खर्चाच्या पैशांतून पूरग्रस्त भागातील आदिवासीपाड्यांवरील दोन शाळांना मदत केली जाणार असल्याचे या मंडळाच्या गौरांग पाटणकर यांनी सांगितले.दांडिया गायब, गरब्याचीच धूमनवरात्रोत्सव म्हटले की, सर्वप्रथम दांडिया आठवतो. पण, यंदा सर्वत्र गरब्याचीच धूम अधिक आहे. त्यामुळे गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाई गरबा खेळताना दिसत आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीthaneठाणे